नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2022’ मध्ये पुण्याच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधील दोन संघांची निवड झाली आहे.

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रकारात ‘ट्रिनिटी ऍकॅडमी’च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. यातील एक प्रकल्प हा सौर उर्जा निर्मितीसाठीचा असून दुसरा भूस्खलनाची स्थिती ओळखण्यात मदत करणाऱ्या प्रणालीबाबत आहे.