मुंबई (वृत्तसंस्था) : वीजपुरवठा खंडित होण्याच्या बनावट मेसेजपासून सावधान राहण्याचं आवाहन महावितरणनं ग्राहकांना केलं आहे. वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असं महावितरणनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. असे मेसेज आल्यास ग्राहकांनी १९१२ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.