मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. राजकीय आंदोलना दरम्यान मंत्रालयात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आज बच्चू कडू गिरगांव न्यायालयात हजर झाले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मरीन लाईन पोलिसांनी बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं असून वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना जेजे रुग्णालयामध्ये नेले जाणार आहे. ३० मार्च २०१६ रोजी सामान्य प्रशासन विभागातले उपसचिव भाऊराव गावित यांना आमदार बच्चू कडू यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता.