नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दीर्घकालीन महागाईचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दारात वाढ केल्यानं जागतिक मंदी येऊ शकते असा इशारा जागितक बँकेनं दिला आहे. अमेरिका, चीन आणि युरोप या जगातल्या तीन महासत्तांच्या अर्थव्यवस्था, सध्या मंदीला सामोरं जात आहेत आणि पुढल्या  वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेत कोणत्याही सामान्य दबावामुळे मंदी येऊ शकते, असं बँकेनं एका निरीक्षणात म्हटलं आहे.

१९७० पासूनच्या मंदीतून सावरल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या मोठी घसरण सुरू आहे आणि ग्राहकांचा विश्वास पूर्वीपेक्षा वेगाने कमी होत आहे. या स्थितीतून बाहेर पाडण्यासाठी धोरणकर्त्यांनी अतिरिक्त गुंतवणूक आणि उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, अशी सूचना बँकेनं केली आहे.