नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल रुपयाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व बँकेनं माहितीपत्र जारी केलं आहे. डिजीटल चलनाबाबतचे उद्देश, त्यासाठीचे पर्याय, लाभ, भारतात डिजीटल चलनासाठी असलेले धोके याबाबत मुद्दे CBDC नं या संकल्पना पत्रात स्पष्ट करण्यात आले आहेत. याबरोबरच डिजीटल चलनाबाबत डिझाइनची निवड, तंत्रज्ञान, डिजीटल रुपीचा वापर, डिजीटल रुपये जारी करण्याबाबतची यंत्रणा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळांत याबाबतची  RBI ची भूमिका, बँकींग यंत्रणेवर त्याचा होणारा परिणाम, चलनविषयक धोरण, आर्थिक स्थैर्य आणि गोपनियता यांचाही विचार करण्यात आला आहे. आरबीआय लवकरच विशिष्ट वापरासाठी प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल रुपयाचा आरंभ करणार आहे असंही या निवेदनांत म्हटलं आहे.