नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय युवा व्यवहार, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)च्या अॅथलीट बायोलॉजिकल पासपोर्ट परिसंवादा – २०२२ ची सुरुवात केली. नॅशनल अँटी-डॉपिंग एजन्सी आणि नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम देशात प्रथमच आयोजित केला जात असुन तो शुक्रवारपर्यंत चालेल. डोपिंगच्या म्हणजे खेळाडूंच्या अंमली पदार्थ सेवन चाचणीच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकूर म्हणाले की, डोपिंगविरोधी आघाडीवर, सरकारने राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरण यांच्याशी करार केला असून आता पोषण पुरक आहाराची चाचणी केली जाऊ शकते आणि त्याची माहिती खेळाडूंना सामायिक केली जाऊ शकते.ते म्हणाले, या परिसंवादाचा देशालाच नव्हे, तर जगालाही फायदा होईल.