नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवळ तीन वर्षात खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून तीन हजार 200 प्रतिभावंत खेळाडू क्रीडा क्षितीजावर चमकले आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. आकाशवाणीवरुन “मन की बात” कार्यक्रमात त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला.
त्यांनी आसाम सरकार आणि तिथल्या जनतेचं खेलो इंडिया क्रिडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केलं. विविध राज्यांमधून सहा हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत 80 विक्रम मोडण्यात आले आणि यापैकी 56 विक्रम मुलींच्या नावे झाले आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.
सरकारनं आता खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 22 फेब्रुवारीपासून कटक आणि भूवनेश्वर इथं या स्पर्धेला प्रारंभ होईल.