नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्यांपैकी मुकेश कुमार सिंह यानं राष्ट्रपतींकडे केलेली दया याचिका फेटाळून लावल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणीही त्यानं केली आहे.
या प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चारही दोषींना येत्या १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घ्यावी लागेल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पीठानं म्हटलं आहे.
न्यायालयानं मुकेश याला सुनावणीसाठीच्या याचिंकांची नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे आपल्या याचिकेची नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत.