मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध १८ जिल्ह्यांमधील १ हजार ७९ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी काल सरासरी ७४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल ही माहिती दिली. सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी देखील काल मतदान झालं. राज्य निवडणूक आयोगाने १ हजार १६५ ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंच पदाच्या; तर काही ठिकाणी सदस्य पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल प्रत्यक्षात १ हजार ७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं. या सर्व ठिकाणी आज मतमोजणी होणार आहे.