नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर कपातीच्या निर्णयाचाही समावेश आहे. गेल्या शुक्रवारी हंट यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
प्रधानमंत्री ट्रस आणि आधीचे अर्थमंत्री क्वारतेंग यांनी गेल्या २३ सप्टेंबरला केलेल्या करकपातीच्या घोषणेमुळे पाउंड या ब्रिटीश चलनाच्या विनिमय दरात विक्रमी घसरण झाली. त्यामुळे बँक ऑफ इंग्लंडला काही आपात्कालीन उपाययोजना कराव्या लागल्या होत्या.