मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
अतिवृष्टीनं शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. तरीही सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. पीकविमा कंपन्याही शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नाहीत तसंच या कंपन्या अतिवृष्टीचे पंचनामे करत नसल्याचा आरोप दानवे यांनी केला.
राज्य शासनाच्या वतीनं दिवाळीनिमित्त गरिबांना स्वस्त धान्य दुकानामार्फत देण्यात येणारा आनंदाचा शिधा किटवर मंत्र्यांचे छायाचित्र छापण्याच्या आग्रहामुळे हे किट वाटण्यात विलंब झाल्याचा आरोप दानवे यांनी केला.