मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली.
या क्लस्टर विकासात २ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचं उद्दिष्ट असून त्यातून ५ हजार रोजगारनिर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. २९७ एकर जमिनीवर उभरण्यात येणाऱ्या या प्रकल्पावर ४९२ कोटी रुपये खर्ज होणार असून त्यातले २०७ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे.
या प्रकल्पाला त्वरित मंजुरी दिल्याबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आभार मानले आहेत. औद्योगिक वापरासाठीच्या तसंच ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौर विद्युत घट आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनासाठी हे क्षेत्र उपलब्ध राहील.