पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथील बालरोग विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) ते १४ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) पर्यंत बालदिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्त बालकांसाठी ० ते १२ वर्ष वयोगटातील सर्व लहान मुलांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरामध्ये, बालदमा, बाल पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी), मतिमंदत्व, त्वचा विकार, मूत्रविकार, उदर रोग मानसिक विकृती, सातत्याने आजारी पडणारी बालके, तसेच निरोगी बालकांसाठी आहार–विहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि आयुर्वेदिक औषधे देण्यात येतील. मेंदूच्या व इतर जीर्ण व्याधिंवर विशेष उपचार पद्धतीची माहिती व सजग पालकत्वासाठी विशेष समुपदेशन आणि सुवर्णप्राशनविधी संस्कार उपक्रम व पंचकर्म बद्दल बालरोग तज्ञ माहिती देणार आहेत, परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. स्थळ– डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे.–OPD No –1 वेळ स. ९ ते दु. ४ असेल.
अधिक माहितीसाठी ८३२९१५२३९८ किंवा ७७९६६६३३६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.