मुंबई (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल ठरला आहे. सांगलीच्या जीएसटी विभागाने तब्बल 91 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सांगली जीएसटी विभागानं गेल्या वर्षभरात जीएसटी संकलनासाठी काटेकोर नियोजन केलं होतं. ऑक्टोबर 2021 मध्ये सांगली जीएसटी विभागाचं कर संकलन हे 75 कोटी रुपये इतकं होतं. यंदा ऑक्टोबर महिन्यात ते 91 कोटी रुपये इतकं झालं आहे. हे कर संकलन देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचा दावा सांगली जीएसटी विभागानं केला आहे.