मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये आज उन्हाळी कांदा दरात घसरण झाली आहे. लासलगावच्या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ५००, तर जास्तीत जास्त १८०० रुपये भाव मिळाला. उमराणे बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ७००, तर जास्तीत जास्त १४०० रुपये भाव मिळाला. उन्हाळी कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण होत असल्यानं संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देवळा इथं बाजार समितीत अर्धा तास लिलाव बंद करून शासनाचा निषेध केला. यानंतर पाच कंदील इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आलं.