नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान्यांनमध्ये उद्या दोहा इथं होणाऱ्या शांतता कराराच्या कार्यक्रमात भारताचे कतार मधले राजदूत पी. कुमारन उपस्थित राहणार आहेत.या करारामुळे अमेरिकी सैन्य अफगाणिस्तान मधून माघारी येणार आहेत.
२००१ पासून अफगाणीस्तान मध्ये असलेल्या २ हजार ४०० अमेरिकी सैनिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. कतार सरकारनं भारताला या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं आहे.
पहिल्यांदाच भारत तालिबान्यांचा सहभाग असणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे.