नवी दिल्ली : दिल्ली सरकारनं केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अमंलबजावणी करायला मान्यता दिली आहे. या योजनेनुसार पात्र शेतकर्‍यांना 6 हजार रूपये वेतन सहाय्य मिळणार आहे.

लोकसभा निवडणूकांपूर्वी अंमलात आणलेल्या या योजनेन्वये शेतकर्‍यांच्या बँक खात्यात तीन समान टप्प्यात 6 हजार रूपये थेट जमा केले जात आहेत. सुमारे 7 कोटी शेतकर्‍यांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला असला तरी पश्चिम बंगाल आणि दिल्ली सरकारनं याआधी या योजनेची अंमलबजावणी करायला नकार दिला होता. आमच्या प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सरकारनं 11 हजार शेतकर्‍यांची नावं या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाठवली आहेत.