नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या  सतीश धवन अंतराळ केंद्रातून  PSLV C-५४ या अंतराळ यानाचं  यशस्वी प्रक्षेपण केलं.  या अंतराळ यानाच्या  पेलोडमध्ये एक महासागर निरीक्षण उपग्रह आणि आठ सूक्ष्म उपग्रह असून ते  दोन तासांच्या निर्धारित वेळेत सूर्याच्या कक्षेत स्थापित केले जाणार आहेत.

अंतराळ यानाच्या ११७ किलो वजनी  पेलोडमध्ये ओशन मॉनिटर, सी सरफेस मॉनिटर, के.यू. बँड, स्कॅबट्रोमीटर आणि फ्रान्सचा पेलोड अर्गोस यांचा समावेश आहे. या अर्गोसच्या मदतीनं  पॅरिस करारानुसार आधीच अंतराळ कक्षेत असलेल्या इंडो-फ्रेंच हवामानविषयक  उपग्रहांची संख्या आणि कार्यक्षमता वाढवली जाईल.