नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवामान बदलासंदर्भात राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत राष्ट्रीय तटीय मोहीम सुरु करण्यासाठी केंद्र सरकार विचार करत आहे, असं केंद्रीय पर्यावण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं.
तटीय आणि सागरी परिसंस्था तसंच किनारी भागातल्या पायाभूत सुविधा आणि तटीय क्षेत्रातल्या समूहांवर हवामान बदलाचा होणारा प्रभाव कमी करणं,  हा या मोहिमेचा उद्देश आहे.
सरकारनं यापूर्वी तटीय आणि सागरी परिसंस्था संरक्षणाच्या दृष्टीनं सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी २०१० मध्ये एकीकृत तटीय  व्यवस्थापन योजना सुरु केली होती, या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.