नवी दिल्ली : भारतीय लष्कराचा दक्षिण विभाग आणि हवाई दलाने येत्या 29 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत राजस्थानच्या वाळवंटात संयुक्त संरक्षण सराव आयोजित केला आहे.
जमीन आणि अवकाश अशा एकत्रित युद्धप्रसंगी शत्रूच्या भूप्रदेशाच्या अंतर्भागातल्या तळांचा वेध घेण्याची क्षमता या सरावा दरम्यान तपासली जाईल. सुमारे 40 हजार सैनिक या सरावात सहभागी होणार असून गेल्या चार वर्षातला हा सर्वात मोठा युद्धसराव असेल.