नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंडोनेशिया दरम्यान सुरक्षा, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रात संबंध आणखी दृढ व्हावेत या अनुषंगानं परराष्ट्रीय व्यवहारमंत्री एस. जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्रमंत्री रत्नो मरसुदी यांच्यात काल नवी दिल्ली इथं बैठक झाली.
या बैठकीत सहाव्या भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या परिषदेचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला, असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे.






