नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमधे गुरुवारी झालेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणूकीत भारतीय पंधरा नेत्यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्थान पटकावलं, प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांच्या हुजूर पक्षानं या निवडणूकीत बहुमत मिळवलं.

सत्ताधारी हुजूर पक्ष तसंच विरोधी मजूर पक्षाच्या प्रत्येकी सात उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. सुमारे १२ खासदारांनी आपले मतदारसंघ कायम राखले असून काही नवीन चेहरेही निवडून आले आहेत.

ब्रिटनच्या माजी गृहसचिव प्रिती पटेल विजयी झाल्यामुळे जॉन्सन यांच्या नव्या मंत्रीमंडळात त्यांचा पुन्हा समावेश होण्याची शक्यता आहे.