नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गंगा नदी पुनरुज्जीवन, संरक्षण आणि व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या बैठकीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशातल्या कानपूरला भेट देणार आहेत.

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल, या बैठकीत मोदी गंगा नदीच्या स्वच्छेतीशी संबंधित कामाच्या विविध पैलूंबाबत चर्चा करतील, तसंच झालेल्या कामाचा आढावा घेतील, त्यानंतर ते ‘नमामि गंगे’ अंतर्गत गेल्या काही वर्षात केलेल्या कामाची बोटीतून पाहणी करतील.

उत्तरप्रदेश, बिहार आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.