नवी दिल्ली : गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्र 2017 मधे देशात दुसर्‍या क्रमांकावर पोचला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोनं याबाबतची आकडेवारी काल जाहीर केली. या यादीत उत्तर प्रदेश सर्वा वरच्या स्थानावर आहे.

देशातले 9 पूर्णांक 4 दशांश टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडल्याची नोंद पोलीस दप्तरात झाली आहे. एकूण 2 लाख 88 हजार 879 प्रथम माहिती अहवाल या वर्षात महाराष्ट्रात नोंदले गेले.