नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं विलिनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचार्यांच्या काही संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली होती. या बंदमुळे देशातल्या बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊन ग्राहकांची गैरसोय झाली.
या विलिनीकरणामुळे बँकांच्या व्यवसायाला काही फायदा होणार नाही, उलट कर्मचारी आणि अधिकार्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असं आज निदर्शनं करणार्या संघटनांनी सांगितलं. विलिनीकरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील, त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.