नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत अलिकडेच दिलेल्या निर्णयावर कांग्रेस पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून हा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारांविरोधात आहे असं म्हटलं आहे.
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आरक्षणाविरोधातील असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज संसदे बाहेर पत्रकारांशी बोलताना केला.