नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या संसर्ग रोखण्यात चीनला सहकार्य करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञांचे पथक पाठवले आहे. दरम्यान चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे दगावलेल्यांची संख्या ९०९ वर पोचली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये काल आणखी सुमारे ९७ रुग्ण दगावले, तर  ३ हजार ७३ नवे रुग्ण आढळल्याची माहितीही आयोगाने दिली आहे.

आतापर्यंत चीनमधल्या ४० हजार २०३, तर इतर देशांमधल्या ३२० जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट झाला आहे. याशिवाय आत्तापर्यंत बऱ्या झालेल्या ३ हजार २८० रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे, तर अजुनही २३ हजार ५८९ संशयित रुग्णांवर देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.