नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन अर्थव्यवस्थांमधे १८ महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या व्यापारयुद्ध शमलं असून दोन्ही देशांनी पहिल्या टप्प्यातल्या व्यापार कराराची घोषणा केली आहे. या करारासाठी रचनात्मक सुधारणा आणि चीनच्या बौद्धीक संपदा तंत्रज्ञान, हस्तांतरण, कृषी, परकीय चलन, आदी क्षेत्रातल्या आर्थिक आणि व्यापार पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या करारानुसार जर चीननं करारातील कुठल्याही बाबीचा भंग केला तर, ट्रम्प प्रशासनाला शुल्कांची फेरअंमलबजावणी करता येणार आहे. चीनी आयातीवरील सध्याचं शुल्क कमी करण्याबाबत अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे, तर चीननं  अमेरिकेकडून सोयाबीन आणि अन्य कृषी उत्पादनं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे.