मुंबई (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाला आणखी स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालिन पीठानं नकार दिला आहे. त्यामुळं उद्या त्यांची जामीनावर कारागृहातून मुक्तता होऊ शकते.
भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेल्या देशमुख यांच्या जामीनाला आणखी स्थगिती देण्याची मागणी सीबीआयनं या पीठाकडे केली होती. ती न्यायालयानं फेटाळून लावली. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी काही सुनावणी झाली नाही तर त्यांची उद्या कारागृहातून जामीनावर मुक्तता होऊ शकते.