नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मागील वर्षात निर्मल गंगा राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ५० प्रकल्प पूर्ण करण्यात आले तर सुमारे २ हजार कोटी खर्चाचे ४३ नवे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. गंगेच्या पाण्याचे शुद्धीकरण करून तिला प्रदूषणमुक्त करणे हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे.

संयुक्त राष्ट्र संघानेही डिसेंबर २०२२ मध्ये नमामि गंगे या कार्यक्रमाची दशकातल्या १० सर्वोच्च्य प्राधान्य आणि पुढाकार कार्यक्रमात गणती केली आहे, अशी माहिती जल शक्ती मंत्रालयाने दिली आहे.