नवी दिल्ली : भारताला आपल्या जवळच्या शेजाऱ्यांसह सर्वच देशांशी संबंध सौहार्दाचे राखायचे आहेत, मात्र देशातली शांतता भंग करण्याचा आणि अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करायचा कोणी प्रयत्न केला तर ते खपवून घेणार नाही, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे.
अझरबैजानमध्ये बाकू इथं आज आणि उद्या होणाऱ्या अलिप्त राष्ट्र चळवळीच्या 19व्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते काल बाकू इथं पोहोचले. त्यानंतर ते भारतीय समुदायाला संबोधित करतताना बोलत होते.
भारत आणि अझरबैजान यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचं त्यांनी यावेळी आवाहन केलं. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एका टपाल तिकिटाचं प्रकाशन केल्याबद्दल त्यांनी अझरबैजानचे आभार मानले.