नवी दिल्ली : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांनुसार 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार आहे. ‘प्रामाणिकपणा-एक जीवनशैली’ ही यावर्षी दक्षता जनजागृतीची संकल्पना आहे. या सप्ताहाचा प्रारंभ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रतिबद्धतेची शपथ घेऊन केला जाणार आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या अभियानादरम्यान, तक्रार निवारणासाठी जनतेशी संवाद, जेनेरिक औषधांचा वापर, चर्चासत्र आणि कार्यशाळा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि सतर्कतेशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.