नवी दिल्ली : गुजरातमधला गांधीनगर जिल्हा हा राज्यातला पहिला केरोसीनमुक्त जिल्हा ठरला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज गांधीनगर मधल्या महिला लाभार्थींना एक हजार गॅस जोडण्यांचं वाटप झालं.

उज्वला योजनेअंतर्गत ओ एन जी सी नं आतापर्यंत 75 हजार लाभार्थींना गॅस जोडण्या पुरवल्या आहेत. त्यावर सहा हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.  यावेळी मध्यम उत्पन्न गटातल्या 480 घरकुल संकुलांचं वाटपही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं.