नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या लहान शेतकऱ्यांची प्रगती झाली तर त्यामुळे देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढेल असं कृषी आणि शेतकरी विकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशात लहान शेतकऱ्यांचं प्रमाण हे ८५ टक्के असून त्यांच्यापुढे खाजगी गुंतवणूकीचं आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.यासाठी सरकारनं दहा हजार शेतकी उत्पादक संस्था सुरु करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी ६ हजार ८६५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.