नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवनिर्वाचित जम्मू-कश्मीर केंद्रशासित प्रदेशानं,आपल्या गुंतवणूक शिखर रोड शो दरम्यान काल मुंबईत २१०० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर सह्या केल्या. नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या पथकानं काश्मिरमधल्या व्यापारी संधीबाबत आणि सवलतींबाबत व्यापारी कंपन्यांना माहिती दिली.
जम्मू-कश्मीरमध्ये औद्योगिक वृद्धी आणि रोजगार संधी वाढावी यासाठी आम्ही सहा शहरांच्या रोड शो चं आयोजन केलं असून बंगळूरु, कोलकत्ता आणि मुंबईच्या यशस्वी भेटीनंतर हे पथक जम्मू, हैद्राबाद, चेन्नई आणि अहमदाबाद इथं जाणार आहे, असं जम्मू-कश्मीरचे नियोजन सचिव रोहित कंसल यांनी सांगितलं मागील काही महिन्यांपेक्षा सध्या काश्मिरात परिस्थिती सुधारली असून गुंतवणूकीत कोणत्याही बाधा येणार नाहीत असंही ते म्हणाले.