नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारायला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. सीमावर्ती भागात दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराची संरक्षण यंत्रणा उभारणं आणि या भागाला बळकट करणं हे याचं उद्दिष्ट आहे.
पाकिस्तानमधून घुसखोर आणि ड्रोनच्या माध्यमातून सीमावर्ती भागात पाठवली जात असलेली शस्त्रास्त्र, स्फोटकं, बनावट चलन आणि अंमली पदार्थांना सीमेवरच रोखता यावं, यासाठी गृहमंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. काश्मीर खोऱ्यातल्या बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये, तर जम्मू प्रदेशातल्या जम्मू, सांबा, कथुआ, राजौरी आणि पूंछ या जिल्ह्यांमध्ये सीमा पोलीस चौक्या उभारण्याची मंजुरी दिली आहे.