मुंबई (वृत्तसंस्था) : धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणार असल्याची घोषणा, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल विधानसभेत केली. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देतांना ते बोलत होते. पाटील यांच्या विनंतीवरून सुमारे दहा १० हजार युवक-युवतींना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये धाराशिव इथं महाजनादेश यात्रेदरम्यान केली होती.