नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड व्यवस्थापनाचं परिक्षण करण्यासाठी देशभरातल्या सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये आज आणि उद्या मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये रुग्णालयातल्या पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापनाची आतत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता या द्वारे तपासली जाणार आहे. या मॉक ड्रिलच्या काळात रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधं, अतिदक्षता विभागातल्या उपलब्ध खाटा, वैद्यकिय ऑक्सीजनची उपलब्धता या बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे. केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय हे या मॉकड्रिलच्या काळात दिल्लीच्या डॉ. राममनोहर लोहिया रुग्णालयात उपस्थित राहून आढावा घेणार आहेत.