मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आज स्वतंत्रपणे मुंबईत राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेछा दिल्या आणि राज्यातल्या सद्य स्थितीची माहिती दिली, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर सांगितलं. त्यापूर्वी शिवसेना नेते दिवाकर रावते राज्यपालांना भेटले. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण राज्यपालांना भेटल्याचं रावते यांनी वार्ताहरांना सांगितलं.
१९९३ पासून आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांना भेटतो, या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तर राजभवनाच्या जनसंपर्क अधिका-यांनीही या भेटी मागे कोणतीही राजकीय भूमिका नसल्याची माहिती दिली.