नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानानं युवकांना जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी प्रेरित करण्यासाठी ४९ विद्यापीठांशी करार केला आहे. नद्यांची शाश्वत परिसंस्था निर्माण करण्याच्या जनचळवळीत विद्यार्थी समुदायाला आघाडीवर आणणं हा या कराराचा उद्देश आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासह गंगा नदीची स्वच्छता आणि शुद्धता सुनिश्चित करणं हे नमामि गंगे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी सांगितलं. जीवन जगण्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. जलसंधारण आणि नदी पुनरुज्जीवनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यापीठांमध्ये वादविवाद आणि इतर स्पर्धा आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.