मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शिक्षण संस्था चालकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत आपण मंडळाच्या पदाधिकाऱ्यासोबत शालेय शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन शिक्षण संस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काल दिले. नागपूर विभागातील राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनाचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते झालं; त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील खासगी शिक्षण संस्थांच्या अडचणी जाणून घेणं महत्वाचं आहे असं सांगून ते म्हणाले की राज्यस्तरावर आराखडा तयार नसताना नवीन शैक्षणिक धोरण अंमलबाजावणीत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत देखील पवार यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.