नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पर्यटन क्षेत्रासाठी अनेक संधी असल्याचं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
आपल्याकडे जंगलं, समुद्र किनारा, किल्ले यासह अनेक उत्तमोत्तम पर्यटन स्थळं आहेत. त्याचा चांगला उपयोग करुन घ्यायला हवा. रोजगार वाढवायला हवा, असं ते म्हणाले. स्वीडन, जर्मनी, अमेरिका यासह अनेक देशांचे अनेक कारखानेदेखील राज्यात असल्याचं ते म्हणाले.
कचरा व्यवस्थापनासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मुंबईत दहा हजार टनावरुन साडेसहा हजार टनावर कच-याचं प्रमाण आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान बदलाचा परिणाम राज्यातही होऊ लागला आहे. हे बदल रोखण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.