मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांच्या पुण्यातल्या फ्लॅटचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मुंडे यांनी बँकेचं 70 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

बँकेनं गेल्या 25 ऑक्टोबरला तशा स्वरुपाची नोटीस वर्तमानपत्रात प्रकाशित केली आहे. मुंडे यांनी कर्जाची परतफेड न केल्यानं बँकेनं प्रतिकात्मक ताबा घेतल्याचं या नोटीशीत म्हटलं आहे. सध्या तरी या फ्लॅटचा ताबा मालकाकडे राहणार असून कर्जाची परतफेड न केल्यास बँक जिल्हाधिका-यांना जागेचा ताबा घेण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवणार आहे.

दरम्यान शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं या महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं आहे. ही बँक राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले संचालित करतात.