नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केरळमधली डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाने चित्रपटावर हेट स्पीच – द्वेषपूर्ण भाषणाला चालना देण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी दिली असून, न्यायालय या चित्रपटावर कोणताही शिक्का लावू शकत नाही, चित्रपट प्रदर्शित करण्याच्या निर्णयाला आव्हान द्यायचं असेल तर योग्य व्यासपीठावरून प्रयत्न करावेत, असं न्यायालयानं सांगितलं.