मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना शेतीचं ज्ञान आणि कौशल्य मिळावं यासाठी पुढच्या शैक्षणिक वर्षापासून कृषी हा विषय इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार आहे असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
अहमदनगर जिल्ह्यात लोणी इथं बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्वावर बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं लोकार्पण केसरकर यांच्या हस्ते झालं; त्यावेळी ते बोलत होते. राज्यासाठी ही शाळा आदर्शवत असल्याचं सांगून जिल्हा परिषद शाळेचं हे प्रारुप राज्यभर राबवण्यात येईल असं केसरकर म्हणाले.