Shri Manoj Sinha taking charge as the Minister of State for Railways, in New Delhi on May 28, 2014.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काश्मीर विश्वविद्यालयात यूथ २० अंतर्गंत आयोजित केलेल्या हवामान बदल आपत्ती,जोखीम आणि जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन केलं. अशा प्रकारच्या बैठकांमुळे या विषयावर जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना बळ मिळेल, असं मत सिन्हा यांनी व्यक्त केलं. हवामान बदलाच्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्न करताना लोकचळवळ आणि पर्यावरणाला अनुकूल अशी जीवनशैलीचा अवलंब करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनचा पुनरुच्चार सिन्हा यांनी केला.