नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने,सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा डेटा आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मागणीनुसार बँकांना तशी माहिती द्यावी लागेल, असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे.उन्हाळी हंगाम लक्षात घेता बँकांनी सावलीच्या ठिकाणी आणि प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. बँकांच्या सर्व काउंटरवर सर्वसामान्यांसाठी दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची व्यवस्था नेहमीच्या पद्धतीनं उपलब्ध असेल, असंही बँकेनं स्पष्ट केलं आहे.