मुंबई (वृत्तसंस्था) : कथित मनी लॉन्ड्रिंग घोटाळा प्रकरणी सक्त वसूली संचालनालय आज राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जयंत पाटील यांची चौकशी करत आहे. या घोटाळ्याच्या संदर्भात ईडीनं जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. यापूर्वी ११ मे रोजी या प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडीनं त्यांना समन्स बजावलं होत. मात्र पाटील यांच्या विनंतीवरून त्यांना १० दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती.
२०१८ मध्ये दिवाळखोरी जाहीर केलेल्या आय एल अँड एफ सी नं कोहिनूर कंपनीला दिलेल्या नियमबाह्य कर्जामध्ये पाटील यांच्या सहभागाची ईडीकडून चौकशी केली जात आहे. २०१९ मध्ये दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गैरव्यवहार विभागानं दाखल केलेल्या तक्रारीवरून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे.