नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी काही हवाईमार्गांवर भाडेवाढ केल्याबद्दल केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री जोतारादित्य शिंदे यांनी काल चिंता व्यक्त केली. हवाईवाहतूक सल्लागार मंडळाबरोबर काल यासंदर्भात नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काही हवाईमार्गांवर अलीकडच्या काळांत शुल्कवाढ करण्यात आली आहे.
विमान कंपन्यांनी निवडक मार्गांवरील विमानभाड्यांचे स्व-निरीक्षण केले पाहिजे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. कोणत्याही नौसर्गिक आपत्तीच्या वेळी विमान कंपन्यांनी माणुसकीच्या आधारे सेवा द्यावी आणि कोणत्याही प्रकारे भाडेवाढ कशी टाळता येईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावं असा सल्लाही त्यांनी दिला. ओदिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मोफत सेवा देण्याचा सल्ला त्यांनी विमान कंपन्यांना दिला.