नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा योजनेत या वर्षी एप्रिलमध्ये १७ लाख ८८ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नोंद झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा निगमनं अर्थात ESIC द्वारे जारी केलेल्या आकडेवारीनुसार,एप्रिल २०२३ मध्ये ३० हजाराहून अधिक नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या असून तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. एप्रिलमध्ये नोंदणी झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये २५ वर्षे वयापर्यंतच्या आठ लाख ३७ हजार कर्मचाऱ्यांची तर महिला सदस्यांची नोंदणी तीन लाख ५३ हजार इतकी झाल्याचं अकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.